सध्या ज्या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे तो चित्रपट म्हणजे ‘विकून टाक‘. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित आणि समीर पाटील दिग्दर्शित ‘विकून टाक’ हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे ‘चांदवा’ हे प्रमोशनल गाणे डॉ. दिव्या बिजूर या अंध मुलीने गायले असून त्या पेशाने फिजिओथेरपिस्ट आहेत. त्यांच्या या गाण्याच्या अनुभवाबद्दल डॉ.दिव्या सांगतात, ” ‘विकून टाक’ या चित्रपटाचे क्रिएटिव्ह कन्सल्टंट राजेंद्र वनमाळी यांनी मला एका समारंभात गाणे गाताना ऐकले आणि त्यांना ते गाणे खूप आवडले. तेव्हा राजेंद्र सरांनी उत्तुंगजींकडे माझी शिफारस केली. त्यानंतर उत्तुंगजींनी माझा आधीचा एक प्रदर्शित झालेला अल्बम ऐकला आणि या चित्रपटामध्ये गाणे गाण्याची संधी दिली. दुसरी गोष्ट म्हणजे ‘अ विवा इनएन प्रॉडक्शन’ सारख्या एवढ्या मोठ्या प्रॉडक्शन’ हाउसमध्ये काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे उत्तुंग ठाकूरजींची मी खूप आभारी आहे. तसेच संगीतकार अमितराज यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न ‘विकून टाक’ या चित्रपटामुळे शक्य
झाले आहे. हा चित्रपट अवयवदानासारख्या महत्वाच्या विषयावर भाष्य करणारा आहे. मला या गाण्याच्या रूपाने एक चांगली संधी मिळाली जेणेकरून मी अवयवदानाबद्दल जागृती पसरवू शकते.”
‘अ विवा इनएन प्रॉडक्शन’ आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ या सिनेमाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले असून, क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून राजेंद्र वनमाळी यांनी काम पहिले आहे. या सिनेमात शिवराज वायचळ, रोहित माने, राधा सागर, ऋजुता देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, रोहित माने, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.

The post ‘चांदवा’ गाण्याला दिव्याच्या आवाजाने चारचाँद appeared first