जयंती
हा चित्रपट शुक्रवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
बहूजन कलाकारांना सोबत घेऊन जयंती या सिनेमा ची निर्मिती केली आहे. हे क्षेत्र खूप मोठे आहे तसेच या क्षेत्रात विशिष्ट वर्गाचेच वर्चस्व राहीले आहे. पण या जयंती सिनेमाच्या माध्यमातून आपल्या बहूजन कलाकारांनी या क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.
सिनेमा हे खूप प्रभावी आणि सशक्त माध्यम आहे. जयंती हा केवळ सिनेमा नसून उभ्या भारतातील पिढ्यान् पिढ्यांची व्यथा मांडली आहे. हि एक ऐतिहासिक कलाकृती म्हणावी लागेल. तूमचा उध्दार करण्यासाठी तूम्हालाच उठावे लागेल. अन्यथा तूमचा अंत निश्चित आहे. हाच डाॅ. बाबासाहेब आंबेडकराचा संदेश आहे.
बाॅलीवूड मध्ये असा सिनेमा बनविण्याची हिम्मत सहसा कुणी करणार नाही. प्रत्येकाने बघावा असा दर्जेदार सिनेमा आहे. विद्रोही असणं Anti caste असणं ही आंबेडकरवादाची पूर्व अट आहे.
जातीय वर्चस्वाला आव्हान देणारी विचारधारा आहे.परिवर्तनाचा विचार मांडणारा हा अप्रतिम सिनेमा सर्वांनी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन अवश्य पहावा.....
SNSHINDE.